आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:गाळणकरनगर, दीपलक्ष्मी काॅलनीत तब्बल १२ दिवसांनतर पाणीपुरवठा

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात महापालिका प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा करत असले काही भागात उशीरा पाणीपुरवठा होतो. प्रभाग क्रमांक १७ मधील गाळणकर नगर, दीपलक्ष्मी कॉलनी, सदिच्छा नगर भागात १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन दिले. प्रभाग क्रमांक १७ उशीरा पाणी येत असल्याने गैरसोय होते आहे.

याविषयी तक्रार केल्यावरही उपयोग होत नाही. नागरिक व महिलांवर काम सोडून पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली आहे. जलस्त्रोतात पाणी उपलब्ध असतांनाही उशीराने पाणी मिळते. प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आंदोलन करण्यात येईल. परिसरात विधंनविहिर करावी, अशी मागणी कैलास माळी, कैलास साेनवणे,मनोज मराठे, हिलाल मराठे, शांतीलाल देसले, तेजमल जैन, विनोद चौधरी, मनोज मोदी, शिरीष वाघ आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...