आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने बंद असतानाही चार वर्षांपासून ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामागे मुबलक पाणी, ठिबक सिंचनाची सोय, उसापासून मिळणारे हमखास उत्पन्न आदी कारणे आहेत. जिल्ह्यात सन २०१९-२०मध्ये १ हजार ६०५ हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये हे प्रमाण ४ हजार ३८१ हेक्टरवर गेले.
पाणी, जमिनीनुसार पिकाची निवड : विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा हमखास उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे कल वाढला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची पुरेशी सोय नाही ते शेतकरी भाजीपाला अथवा बहुपीक पद्धतीचा अवलंब करत आहे. दुसरीकडे जास्त जमीन, मुबलक पाणी, ठिबक सिंचनाची साेय असणाऱ्यांकडून नगदी पिके घेतली जाता आहे. उसाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बागायतदार शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देता आहे.
बाहेर जिल्ह्यात विक्री होतोय ऊस
जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने बंद आहेत. नवलनगर येथील साखर कारखाना भंगारात विक्री झाला. साक्री येथील पांझराकान साखर कारखाना बंद आहे. तो भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू आहे. शिरपूर कारखानावर जिल्हा बँकेचे कर्ज वाढल्याने तो सात ते आठ वर्षांपासून बंद आहे. ही स्थिती असताना शेतकऱ्यांकडून उसाचे उत्पादन घेतले जाते. कारण शेजारी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, द्वारकाधीश, आयान व जळगाव व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखानादारांकडून जिल्ह्यात उत्पादित हाेणारा ऊस खरेदी केला जातो.
नंदुरबारच्या कारखान्यांचे गाळप
सातपुडा : ४ लाख ६१ हजार मे टन.
आदिवासी : २ लाख ८ हजार मे.टन
आयान : ११ लाख ६६ हजार ९० मे.टन
वाहतूक खर्च कमी, देखभालीची जास्त चिंताही नाही
जिल्ह्यात तापीवर बॅरेज झाले. त्यामुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते ऊस लागवड करतात. कमी मजूर, देखभालीचा त्रास कमी व हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड केली जाते. जिल्ह्यात यापूर्वीही पाच हजार हेक्टरपर्यंत उसाची लागवड हाेत हाेती. मात्र, मध्यंतरीच्या काळात दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची उपलब्धता नव्हती. त्यामुळे उत्पादन कमी झाले होते. आता ते वाढले आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील कारखान्यांकडून ऊस घेतला जातो. उत्पादन खर्च, वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांचा चांगले पैसे मिळतात. त्यामुळे अनेकांकडून नगदी पीक म्हणूनही उसाचे उत्पादन घेतले जात आहे.
एस.डी.मालपुरे, उपविभागीय कृषी अधिकारी, प्रिंपी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.