आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक सभा:कापडण्याचा जलकुंभ विना कामाचा: पं.स. सदस्य हस्तांतरण, ग्रामपंचायत लक्ष देत नाही : अधिकारी ; ड यादीचा मुद्दाही सभेत झाला उपस्थित

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कापडणे गावातील पाण्याची टाकी कुचकामी आहे. या टाकीत पाणीच पडलेले नाही, गावातील नागरिकांसाठी काही फायदा नाही, पाच महिन्यांपासून तक्रार करत आहे. मात्र कोणी पाहण्यासाठी येण्यास तयार नसल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. या वेळी ग्रामीण पाणीपुरपवठा विभागाचे उपअभियंता संजय पढ्यार यांनी योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. टेस्टिंग देखील केली आहे. मात्र ग्रामपंचायत पाणी टाकत नसल्याचे सांगितले. पंचायत समितीची मासिक सभा सभापती विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मंचावर गटविकास अधिकारी अार.डी.वाघ, बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय देवरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय पढ्यार, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच कापडण्याच्या सदस्यांनी कापडणे गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा उपस्थित केला. पाच महिन्यांपासून सातत्याने या विषयावर तक्रार करत आहे. मात्र कोणी लक्ष देण्यास तयार नाही, पाण्याच्या टाकीत पाणी टाकण्यात येत नाही. लोक तक्रारी घेऊन येतात, मात्र फारसे लक्ष देण्यात येत नाही. या वेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय पढ्यार यांनी टाकीत पाणी भरण्यात आले. त्याच बरोबरच टेस्टिंगदेखील करण्यात आले. त्यानंतर टाकी ग्रामपंचायकडे हस्तांतरण करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत पाणी टाकत नसल्याचे सांगितले. यावेळी सदस्यांनी सांगितले की, आपल्या सोबत चला जर टाकीत पाणी दिसले तर त्याच ठिकाणी जीव देऊ, असे सांगितले. या वेळी सभापतींनी हा मुद्दा ग्रामपंचायतीचा असल्याचे सांगत विषयाला बगल दिली. या वेळी सदस्यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ड यादीचा मुद्दा उपस्थित केला. ड याद्यांमधे अनेक खऱ्या लाभार्थी उडवण्यात आल्याचा आरोप केला. यावर गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले की, ड यादीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या आहेत. खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या लाभार्थींना अपात्र ठरवण्यात आले आहे. या संदर्भात पुनरीक्षणासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली. सभेत उपअभियंता देवरे यांनी तालुक्यात बांधकाम उपविभाग १ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. तर संजय पढ्यार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...