आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी:नगावबारीला सहा, वलवाडीत आठ, साक्री रोडला 7, हजारखोलीत 10 दिवसांनी पाणी; बहुतांश भागात साधारणपणे पाच ते सात दिवसांनंतरच पाणी येते

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढते आहे. तापमानाचा पारा ४१ अंशांवर गेला आहे. दुसरीकडे शहरातील सर्वच भागात असमान पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते त्यानंतरही बहुतांश भागात साधारणपणे पाच ते सात दिवसांनंतरच पाणी येते.

शहरातील सर्व भागात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. नेहमी काहीतरी तांत्रिक कारणामुळे विलंबाने पाणीपुरवठा होतो. शहरातील नगावबारी परिसरात ६ ते ७ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. या परिसरात भूजल कॉलनी, आरती सोसायटी, कृषी काॅलनी भागासह अन्य वसाहतींचा समावेश आहे.

ऐंशी फुटी रोड, हजारखोली, आझादनगर, कबीरगंज, हाजीनगर, मिल्लत नगर भागात १० दिवसांनंतर तर चाळीसगावरोड परिसरात ५ ते ७ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो.शहरातील पारोळारोड परिसरातील मार्केट कमिटी भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. या भागातील रामनगर, नवनाथनगर भागात नियमित पाणीपुरवठा होत असल्याची स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...