आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतांमध्ये पाणी साचले, किडीचा माेठा प्रादुर्भाव

शहादा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना चांगलाच वेग आला आहे. शेतकऱ्यांनी संततधार पाऊस झाल्याने सध्या सर्वाधिक भर कीटकनाशक फवारणीवर दिला आहे.

जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतांमध्ये माेठ्या प्रमाणात पाणी साचले असून, पिकांचे नुकसान झाले तर काही पिकांना जीवदान मिळाले अशी स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यात लावलेला कापूस व सोयाबीन यांची स्थिती उत्तम आहे. पिके मोठी झाल्याने डोलायला लागली असून, शेतकरी तण काढत आहेत. शेतमजुरांना रोजगार मिळाला आहे. शेतकरी व शेतमजूर सकाळपासून उशिरा सायंकाळपर्यंत शेतात कार्यमग्न झालेले दिसतात. पावसाने दिलेल्या उघडीपमुळे उन्ह-वारा यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अति पावसामुळे पिकांवर किडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे पीक वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी जास्तीत जास्त कीटकनाशक औ षधी फवारणीच्या कामावर भर देत आहेत. पिकांना रासायनिक खतांचा हप्ताही दिला जात आहे.

कपाशी लागवडीपासून एकरी २५ ते ३० हजार खर्च
माझ्या १४ एकर शेतात कापसाची लागवड केली आहे. जुलै महिन्यात जास्त पाऊस झाल्याने कपाशीचे नुकसान झाले आहे. उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कीटकनाशक औषधींची फवारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी आता फवारणी करत आहेत. रासायनिक खताचा तुटवडा भासल्याने शासनाने खते उपलब्ध करावी. कापूस लागवडीपासून आतापर्यंत एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी गिरीश पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...