आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आम्ही भोगले, तुम्ही सावध व्हा,मद्याचे व्यसन साेडा; नवसंजीवनी समूहामुळे साडेसातशे जण मद्यपानापासून दूर

नीलेश भंडारी | धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनाचे दुष्परिणाम माहिती असतानाही अनेक जण मद्यपान करतात. मद्यपींनी व्यसन साेडावे यासाठी एकेकाळी मद्यपानाच्या आहारी गेलेले व आता व्यसनमुक्त झालेले एकत्र आले आहे. त्यांनी मद्यपान करणाऱ्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मद्यपानाचे दुष्परिणाम आम्ही भाेगले, तुम्ही वेळीच सावध व्हा, मद्यपानाचे व्यसन साेडा असे आवाहन करून नवसंजीवनी समूहाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करता आहे. त्यामुळे साडेसातशे जणांनी मद्यपान बंद केले आहे.

व्यसनमुक्तीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अल्काेहाेलिक्स अॅनाॅनिमस या स्वयंसेवी संस्थेतंर्गत असलेली नवसंजीवनी संस्था शहरातील मद्यपींना मद्यपानापासून दुर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ताणतणाव, वाईट संगतीतून अनेकांना मद्यपानाचे व्यसन जडते. अतिमद्यपानामुळे अनेकांचे कुटुंब उद‌्ध्वस्त झाले आहे. मद्यपानाच्या आहारी गेलेल्या अनेकांना पश्चात्तापही हाेताे.

पण मद्यपानाचे व्यसन कसे सोडावे हे त्यांना माहीत नसते. त्यांच्यासाठी नवसंजीवनी संस्था मोलाची ठरते आहे. या संस्थेचे सर्व सदस्य हे पूर्वी मद्यपी हाेते. मात्र, त्यांनी आता व्यसन साेडले आहे. व्यसनामुळे त्यांना झालेल्या त्रास इतरांना होऊ नये यासाठी आता संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करतात. त्यासाठी मद्यपींचे समुपदेशन व जनजागृती करतात.

एकमेका सहाय्य करू’नुसार होते काम
शहरात गेल्या सहा वर्षांपासून संस्थेचे कार्य सुरू आहे. राेज कनाेसा हायस्कूलमध्ये समूहाच्या सदस्यांची व ज्यांना मद्याचे व्यसन साेडायचे आहे. त्यांची बैठक हाेते. बैठकीला ५० सदस्य उपस्थित असतात. कोरोना काळात जुन्या जिल्हा रुग्णालय व त्यापूर्वी नूतन पाडवी शाळेत संस्थेची बैठक होत होती. संस्थेचे कार्य आता अमळनेर, चाेपडा, दाेंडाईचा, शिरपूर आदी तालुक्यात पाेहाेेचले आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या पंक्तीनुसार संस्थेचे जिल्ह्यात अनेक सभासद आहे. आत्तापर्यंत साडेसातशे जण मद्यपान मुक्त झाले आहे.

अॅनाॅनिमसचे १८० देशात आहे काम
अल्काेहाेलिक्स अॅनाॅनिमस या स्वयंसेवी संस्थेची अमेरिकेत सन १९३५ मध्ये स्थापना झाली. सद्य:स्थितीत १८० देशात संस्था कार्यरत असून लाखाे नागरिक संस्थेमुळे मद्यपानमुक्त झाले आहे.

मद्यपान सोडल्याने जीवन आनंदी
मित्रांच्या संगतीमुळे व्यसन लागले. माझ्यासाठी नवसंजीवनी समूह जीवन संजीवनी ठरला. संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर मद्यपान बंद झाले. आता आनंदी जीवन जगतो आहे. - मनीष के. देवपूर

बातम्या आणखी आहेत...