आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:काही दिवसापूर्वी विवाह; नवविवाहित परिचारिकाने केली सासरी गळफास घेत आत्महत्या

शिरपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जोयदा येथे काही दिवसापूर्वी विवाह झालेल्या २६ वर्षीय नवविवाहित नर्सने सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनिषा तोताराम पावरा वय. २६ रा. दोंडवाडे, जोयदा ता. शिरपूर असे विवाहितेचे नाव आहे.

शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी येथील माहेर असलेल्या व वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या मनिषा पावरा यांचा २२ मे रोजी दोंडवाडे-जोयदा येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तोताराम पावरा यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्या काही दिवसापूर्वी सासरी आल्या होत्या. त्यांनी १६ जूनला सासरी राहत्या सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...