आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा शहर व तालुक्यातील वजन काटे बाबत व्यापाऱ्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत असून जिल्हात एकच अधिकृत एजंसी असल्याने ते मनमानी पद्धतीने आकारणी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांना ग्राहक मंच व व्यापारी संघटनतर्फे निवेदन दिले.
तळोदा तहसील कार्यालयात व्यापारी व वजन काटे माप निरीक्षक यांची बैठक तहसीलदार गिरीश वखरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या वेळी वजन काटे माप निरीक्षक भूषण हावडे यांचाशी व्यापाऱ्यांनी चर्चा केली. यात व्यापाऱ्यांचे समाधान करू शकले नाहीत.
यात काही मुख्य प्रश्नावर चर्चा झाली त्यात वजन काटे दुरुस्ती व पाहणी साठी जिल्हात एकमेव अधिकृत एजन्सी असून त्याला नियमावली कोणती आहे? तसेच संबंधित एजन्सीकडून प्रत्येक व्यापाऱ्याला वेगवेगळे दर कसे काय? याबाबत उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की आमचे त्याचावर कोणतेही बंधन नाहीत. त्यामुळे व्यापारी प्रचंड नाराज झालेत. नियमाप्रमाणे फी व्यतिरिक्त मनमानी पद्धतीने अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
अनेक ग्राहकांकडून प्रतिकाट्यामागे सुमारे १५०० ते २० हजारांपर्यंत अधिक फी आकारली जात आहे. तळोदा तालुक्यात विविध सहकारी संस्था, ५० टनी वजन काटा, पेट्रोल पंपचालक, किराणा व्यावसायिक, भाजीपाला व्यावसायिक आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व ग्राहकांना वजन काटे वापरावे लागतात. दरवर्षी तपासणी नावाखाली ग्राहकांची सरकारच्या फी व्यतिरिक्त लूट सुरू आहे, असा आरोप केला. या वेळी व्यापारी महासंघ उपाध्यक्ष राजेंद्र कोचर, अमित ठक्कर, प्रसाद सोनार, सचिव मनोज भामरे, प्रशांत गांधी, मुन्नू सोनार उपस्थित होते
श्रेणी बाबत व्यापारी अनभिज्ञ, जनजागृती आवश्यक
दरम्यान, तळोदा शहर व तालुक्यात अनेक व्यापारी असून त्यांना त्यांचा वापरात असलेला काटा कोणत्या श्रेणीत आहे, याची अजिबात कल्पना नाही. याबद्दल तीन श्रेणी असतात त्यानुसार आकारणी होत असते. श्रेणी बद्दल सविस्तर माहिती घेतली असता याबाबत व्यापारी वर्गास काहीही माहीत नसल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.