आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टिट्रेड एल. एल. पी युनिट -१. साखर कारखान्याच्या संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची तपासणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यमापन शास्त्र विभागाच्या भरारी पथकाकडून करण्यात आली. आयन साखर कारखान्यावरती गाळपासाठी ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टरचे व ट्रकचे अत्याधुनिक संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरती वजन करण्यात आले. त्यांचे वजनमाप अचूक आले. वजन करण्यासाठी आलेल्या या भरारी पथकात, वैद्यमापक शास्त्र विभागाचे निरीक्षक प्रशांत खडाख, नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार, साखर आयुक्तांचे प्रतिनिधी जी. ए. देवरे, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी नथू पाटील, पवन पाटील, हंबीरराव चव्हाण व कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी कारखान्यामध्ये उपलब्ध असलेल्या संगणकीकृत इलेक्ट्रिक वजन काट्यांचे पथकाकडून तपासणी करण्यात आली. प्रत्येक संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजन काट्याच्या वजन झालेल्या वाहनाचे वजन ऑफिसच्या आतील बाजूस व वाहनधारकांना तसेच ऊस उत्पादकांना ठळकपणे दिसेल, अशा वजन दर्शवणारे मोठे डिस्प्ले लावण्यात आलेले आहेत. या भरारी पथकाकडून वजन काट्यांची तपासणी करण्यापूर्वी या संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरून वजन करून ऊस गाळपसाठी गव्हाणकडे गेलेल्या वाहनांना वजन काट्यावरती पुन्हा वजन करण्यासाठी बोलवण्यात येवून त्यांची फेरतपासणी करून त्यांचे वजन निरीक्षण नोंदवण्यात आले. या भरारी पथकाने वजन काट्यांचे विविध निकषांच्या आधारे तपासणी करून कारखान्यातील वजन काटे हे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास देण्यात दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.