आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:पोलिस दलाच्या सद्भावना दौडचे सारंगखेड्यात स्वागत

सारंगखेडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्भावना दाैड रॅलीचे येथील पोलिस ठाणे हद्दीत आगमन झाल्यानंतर तिचे स्वागत करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने ही रॅली काढण्यात आली.

‘पुढचे पाऊल प्रगतीच्या दिशेने’ असे ब्रीद ठरवून पोलिस कर्मचाऱ्यांनी सद्भावना दौडमध्ये सहभागी हाेऊन ११ किमीचा पहिला टप्पा शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे पूर्ण केला. त्यांचे सारंगखेडा पोलिस ठाणे हद्दीत आगमन हाेताच शहादा, सारंगखेडा येथील पोलिस अधिकाऱ्यांमार्फत दाैडचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहादा पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे व सारंगखेडा पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी आलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वृक्षांचे राेप देऊन त्यांचे स्वागत केले.

पोलिस ठाणे आवारात वृक्षाराेपण
सद्भावना दौडमध्ये सहभागी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येथील पोलिस ठाण्याच्या आवारात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे अधिकारी व महिला अधिकारी, सारंगखेडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर पुढील दाैड सुरू झाली. पावसाच्या सरी बरसत असतानाही सद्भावना रॅली थांबवली नाही, दौड पुढे सुरूच ठेवून लक्ष्य गाठले. यातून सर्वांना प्रेरक संदेश देण्यात आला. या रॅलीमुळे चैतन्य निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...