आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर:शिवराम भीमजी अंतुर्लीकर विद्यालयात मुलांचे स्वागत

शिरपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाजत गाजत स्वागत

येथील आदी जनता विद्या प्रसारक संस्थेचे शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला. पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे बँड पथकाच्या साह्याने वाजत गाजत गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता. रांगोळ्या काढून पताके लावले होते. त्यांना चॉकलेट देऊन वर्गात प्रवेशित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पुस्तके वाटप करण्यात आली. मुख्याध्यापक आय.पी.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला. सूत्रसंचालन के.बी.लोहार यांनी केले. एस. बी. बडगुजर, पी. ए. बडगुजर, जे. बी. पाटील, डी. ए. पाटील, एन. जे. गोसावी, एस. एम. दौड यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...