आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चपदस्थ:कोविडने पितृछत्र हरपल्यावर घर सांभाळून मोहिनी चकमली; उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा गुणवंताचा मानस यशाचा संकल्प

धूले15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडमुळे पितृछत्र हरपल्यानंतर मोहिनी गायकवाडवर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी आली. या स्थितीत न डगमगता तिने कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. तसेच दहावीच्या परीक्षेत ८३ टक्के गुण यश संपादन केले. उच्च शिक्षण घेवून जिल्हाधिकारी होण्याचा तिचा मानस आहे. सोनगीर येथील शिवदास गायकवाड यांचे धुळे येथे कृषी साहित्य विक्री करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना मोहिनीसह चार मुले आहे. कोविडमुळे २ जून २०२१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

अचानक घराचा आधार गेल्याने काय करावे असा प्रश्न मोहिनी व तिच्या आईसमोर होता. मोहीनीने शिवणकाम करून आर्थिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय गावात एलआयसीचे अर्ज भरून देण्याचे काम केले. तसेच शाळेतही किरकोळ कामे करून आर्थिक प्रश्न सोडवला. दुसरीकडे तिचे शाळेकडे दुर्लक्ष झाले. सोनगीरच्या एन. जी. बागूल हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिस्थिती लक्षात घेवून मोहीनीला सहकार्य व मार्गदर्शन केले. परीक्षा शुल्कापासून वडीलांच्या उपचारासाठी शिक्षकांनी मदत केली. मोहीनीने परीक्षेला एक ते दोन महिने शिल्लक असताना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून ८३.२० टक्के गुण मिळवले. हे यश प्रेरणादायी आहे.

दिवसा सरपण जमा करून रात्री अभ्यास करणारी सविता घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दिवसा सरपण जमा करून रात्री वीज नसेल तेव्हा दिव्या खाली बसून अभ्यास करणाऱ्या सविता संतोष मालचने ७६.४० टक्के गुण मिळवले.

सविता शहरातील इंदाई देवी माध्यामिक विद्यालयात शिकते. ती शहरापासून जवळच असणाऱ्या हरणमाळ येथे राहते. ती राहणाऱ्या आदिवासी वसाहतीत ५० कुटूंब असून या राहणाऱ्या कुणीही शिक्षण घेतलेले नाही. घरापासून सविताची शाळा पाच किलोमीटरवर आहे. पण शिक्षणाची आवड असल्याने ती कधी पायी, कधी सायकलवर तर कधी शिक्षकांच्या दुचाकीने शाळेत जात होती. तीचे आई-वडील मजूरी करतात. मुलीचे खूप शिकावे अशी त्यांची इच्छा असून ही इच्छा सविताने चांगले गुण मिळवून पूर्ण केली.तिला शिक्षक योगेश देवरे यांनी सहकार्य केले. अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.

अंधत्वावर मात करत मनोजची भरारी
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील दिव्यांग विद्यार्थी मनोज पवारने दहावीच्या परिक्षेत ६४ टक्के गुण मिळवले. कोरोनामुळे शाळेत येता न आल्याने मनोजने घरी राहुन अभ्यास केला. तो औरंगाबाद जिल्ह्यातील मुळ रहिवासी असून जन्मत: अंध आहे. दोन वर्ष कोरोना असल्यामुळे त्याला शाळेत येता आले नाही. पण न खचता त्याने अभ्यास केला. लेखनीकाच्या मदतीने त्याने परीक्षा दिली. तो आता पुढील शिक्षणासाठी नाशिकला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...