आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाक्री तालुक्यातील धवळीविहीर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याने भक्ष पाहून पिंजऱ्यात प्रवेश केला. यानंतर क्रेनच्या मदतीने पिंजरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पिकअपमधून हा पिंजरा लळिंग कुरणात नेण्यात आला. पिंजरा उघडताच पूर्णत: सुदृढ असलेल्या या बिबट्याने कुरणात धूम ठोकली. धवळी विहीर गाव शिवारात रमेश पवार यांच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत मध्यरात्री बिबट्या पडला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वन विभागाचे पथक दाखल झाले. रेस्क्यू पथकान पिंजरा मागवून त्यात कोंबडी सोडली. भक्ष पाहून बिबट्या पिंजऱ्यात शिरताच गेट बंद केले.
रेस्क्यू ऑपरेशचे शिलेदार
वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक माणिक भाेसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक संजय पाटील व पथकातील वनक्षेत्रपाल पी. बी. पाटील,अरुण मालके, संजय पाटील, रोशना काकुस्ते, नीता म्हसके, विजय राठोड, अमित साळवे, भोये, वराडे, नीलेश पाटील, स्मिता पटील, अमोल पवार, संजय भामरे सहभागी होते.
बिबट्याची मोहीम वेळेत केली फत्ते
माहिती मिळाल्यावर पथकासह रवाना झालो होतो. बिबट्याला रेस्क्यूचा प्लॅन आधीच आखला होता. त्यावर काम केले. टीमवर्कमुळे अवघ्या काही वेळात बिबट्या पिंजऱ्यात आला. शिकार करण्यास तो पूर्ण सक्षम व सुदृढ होता. त्यामुळेच कुरणात त्याला सोडले. संजय पाटील, सहायक वनसंरक्षक, धुळे
बिबट्या होता सुदृढ
विहिरीत पडल्यामुळे बिबट्या जखमी झाल्याचा अंदाज पूर्णत: फोल होता. हा बिबट्या सक्षम व सुदृढ होता. शिवाय त्याची आवश्यक वाढ झाली होती. शरीरानेही तो मजबूत होता. गर्दीला पाहून तो विहिरीतून गुरगुरत होता.
लळिंग कुरणाला प्राधान्य
लळिंग कुरण सुमारे ४ हजार हेक्टर अशा परिसरात विस्तारले आहे. शिवाय वन्यजीवांच्या अन्नसाखळीशी निगडित इतर वन्यजीवही याच ठिकाणी आहेत. तसेच बारामाही पाणी असलेले तीन तलाव कुरणात आहे.
हरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर
हरणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाही. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कारणही स्पष्ट होईल. घटनेचा सर्व अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. महेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, धुळे
नियमानुसार काळवीटचे केले दहन
मांडळ शिवारात मृत काळवीट आढळून आले. विठ्ठल पवार यांच्या शेतविहिरीत हे काळवीट मृतावस्थेत आढळून आले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, शांताराम मराठे व इतर दाखल झाले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी जागेवर शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभाागाच्या नियमानुसार या काळाविटाचे दहन करण्यात आले.
तीन गुरांचा फडशा
धवळी विहीर, झंझाळे, मैंदाणे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. दोनदा करमसिंग वंजारी यांच्या शेतातील वासरू बिबट्याने फस्त केले. तसेच रमय्या वंजारींच्या शेतातील वासरू भक्ष केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.