आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निंदनीय:हाणामारीचे फुटेज शोधतांना समोर आला विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकावर; थेट दिल्लीत तक्रार झाल्यावर साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीशी अंगलट व अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर आला. काही महिन्यांपूर्वी शाळेत झालेल्या हाणामारीचे फुटेज शोधतांना हा घाणेरडा प्रकार उघडकीस आला. कौतिक चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. पण संस्थेने कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरुण घातले. त्यामुळे शाळेतील लिपिकाने दिल्लीतील संस्थेकडे ऑनलाइन तक्रार दिली. त्यानंतर साक्री पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात कार्यरत लिपिक विजय भिलाजी अहिरे (वय २८ ) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार इंग्रजी विषयाचे शिक्षक कौतिक साहेबराव चव्हाण यांनी दहावीतील मुलींसोबत अंगलट, अश्लील चाळे करून विनयभंग केला. हा प्रकार २० नोव्हेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२१ या दरम्यान घडला. याबाबत मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र अहिरे व त्यांचे पती नरेंद्र आत्माराम देवरे यांना कळवले. शिवाय फुटेज दिले. पण देवरे दांम्पत्याने शिक्षक चव्हाणवर कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरुण घातले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन साक्री पोलिस ठाण्यात शिक्षक कौतिक चव्हाण, मुख्याध्यापिका वर्षा देवरे, नरेंद्र देवरे यांच्या विरोधात गुन्हा (११४/२०२२) दाखल झाला आहे. साक्री पोलिस ठाण्याचे अधिकारी अजय चव्हाण तपास करत आहे.

गुन्हा आला समोर | शाळा परिसरात वाद झाला होता. त्यातून महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होती. त्या वेळी एका खोलीत विद्यार्थिनी सोबत अंगलट करताना शिक्षक कौतिक चव्हाण दिसले.

पुरावे हाती तरीही आव्हान
गुन्ह्यातील पुरावे अहिरे यांनी पोलिसांना दिले आहे. त्यामुळे हे पुरावे तपासातील महत्त्वाचा टप्पा ठरतील. पण तरीही तपास पूर्ण झालेला नाही. तक्रारीत सत्य दिसत असले तरी त्यामागील नेमके कारण व तथ्य पोलिसांना समोर आणावे लागणार आहे. सोबतच पीडितेचा जबाबही घेतला जाऊ शकतो.

संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदारांनी सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. संशयिताला अटक करण्यापूर्वीच तो पसार झाला आहे. त्यामुळे शोध सुरू आहे. इतरांचेही जबाब घेतले जाणार आहे. अजय चव्हाण, पोलिस निरीक्षक, साक्री पोलिस स्टेशन

तक्रारीने नोकरीवर आली गदा
शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या हेतूने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. कॅमेऱ्याचे फुटेज तपासताना हा प्रकार समोर आला. परंतु तक्रारीकडे दुर्लक्ष झाले. तक्रार दिल्यामुळे नोकरीवरही आता गदा आली आहे. विजय अहिरे, तक्रारदार

अन् दिल्लीवरून आदेश
ऑनलाइन पध्दतीने झालेल्या तक्रारीची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर दिल्लीहून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. अहिरे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात पुराव्यांसह बोलवण्यात आले. पुरेशी खात्री झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले.

काय घडले २ मार्चला
तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लिपिक अहिरे यांनी दिल्लीतील नॅशलन कमिशन फॉर प्रोटेक्श ऑफ चाईल्ड राईट्स अर्थात राष्ट्रीय बालअधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाकडे ऑनलाइन तक्रार दिली. त्यांनी २ मार्च २०२२ रोजी ही तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...