आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला विधवा महिलांचा केला गेला; संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे विविध उपक्रम

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठा सेवा संघ प्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला. पतीचे निधन झाल्यावर विवाहित महिलेच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते. बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे काढून तिची अवहेलना केली जाते. हा प्रकार बंद झाला पाहिजे. पतीचे निधन झाल्यावर महिला संपूर्ण कुटुंबाचा भार निर्भीडपणे सांभाळतात. पण अनिष्ट प्रथांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते.

सतीची प्रथा जशी बंद झाली तशीच पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसण्यासह अन्य अनिष्ट रूढी बंद झाल्या पाहिजे. विधवा महिलांना समाजाने सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन विधवा महिलांचा मराठा सेवा संघ प्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. सीमा पाटील या विधवा महिलेच्या कपाळाला कुंकू लावून, हातात बांगड्या, मंगळसूत्र व जोडवे घालून सत्कार करण्यात आला.

या वेळी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी प्रबोधन केले. परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षा यामिनी खैरनार, विभागीय अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाध्यक्षा शीतल पाटील, आरोस्तोल पाटील, आशा पाटील, मंगला पाटील, सुशीला पाटील, प्रतिभा पाटील, वंदना सूर्यवंशी, निर्मला वाणी, मंदा मोरे, शैला भामरे, बेबी पवार, दिपीका पाटील, साक्षी देवरे, सोनल भामरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...