आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पत्नी दिवाळीनिमित्त माहेरी, पतीची आत्महत्या

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील विवाहिता दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती. या वेळी पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. काशिनाथ रोहिदास मराठे (वय ३८) असे मृताचे नाव आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर मराठे यांना नातलगांनी सोनगीर ग्रामीण रुग्णालय व तेथून हिरे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करून कागदपत्रे शिंदखेडा पोलिसांना पाठवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...