आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांची नासधूस:रानडुकरांनी केली पिकांची नासधूस, भरपाईची मागणी

धडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील जामलीच्या घंंटीपाडा पाठोपाठ उमटी येथील आरशी देवजी तडवी, खाअल्या आरशी तडवी या शेेेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे रानडुकरांकडून नासधूस झाली आहे. पिकांचे नुकसान सुरूच असून, जामली घंटीपाडा व उमटी येथे रानडुकरांंकडून झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

अककलकुवा तालुक्यातील जामलीच्या घंटीपाडा येथील बामण्या टेबऱ्या तडवी, चमाऱ्या शिवा तडवी, दिलीप उगराण्या तडवी, दतऱ्या खिमजी तडवी व उमटी येथील आरशी देवजी तडवी, खाअल्या आरशी तडवी या शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमूग व मका पिकांचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात येत आहे. वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व भुईमूग व मका पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी दिलीप तडवी, बामण्या तडवी आदींनी तहसीलदार मस्केंकडे केली.

बातम्या आणखी आहेत...