आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:शिरपूरला ग्रीन सिटी करणार; विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, सायकल ट्रॅकचीही निर्मिती; माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांचा शिरपूरला गौरव, भूपेश पटेल यांचे मत

शिरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर शहरात येत्या वर्षभरात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न होणार आहे. शिरपूरला ग्रीन सिटी केले जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शाळानिहाय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांनी केले.

येथील पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरपूर वरवाडे नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माजी नगराध्यक्षा जयश्री पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, आर.सी. पटेल संस्थेच्या ट्रस्टी केतकी पटेल, कृती पटेल, रिटा पटेल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कापडी पिशवीचे लाँचिंग करण्यात आले. या वेळी नगरसेविका, पर्यावरणदूत, पाककला, रांगोळी, चित्रकला, पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आत्मनिर्भर वॉर्ड स्पर्धेतील नगरसेवक-नगरसेविकांचाही सत्कार करण्यात आला. पायलट प्रोजेक्ट म्हणून जुनी चप्पल व बूट जमा करून नवीन चप्पल तयार केल्या जाणार असून, या चप्पल गरजू मुला-मुलींना दिल्या जातील.

या उपक्रमाला प्रारंभ झाला. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, शिरपूरवासीयांनी पाणीपट्टी १०० टक्के भरून सहकार्य करावे. लवकरच शाळानिहाय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी होईल. तसेच आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केली जाईल. लवकरच शहरातील नागरिकांसाठी सायकल व वॉकिंग ट्रॅकचे काम केले जाईल. एसटीच्या संपामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या. त्यामुळे मुकेशभाई पटेल ट्रस्टमार्फत मुलींसाठी मोफत ये-जा करण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.

मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले, शिरपूरवासीयांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करावा. नगरपालिकेच्या ९ पैकी २ शाळांमध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबवला जातो आहे. उर्वरित शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...