आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:ताशी 34 किमी वेगाने वारे, वीजपुरवठा खंडित ; नागरिक विविध उपाययोजना करत आहे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात शनिवारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वीजवाहिन्यांना वृक्षांच्या फांद्याचा स्पर्श होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे देवपूर दत्त मंदिर, वलवाडी भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित होत होता. सायंकाळी वाऱ्याचा वेग ताशी ३४ किलोमीटर इतका होता. शहरात तापमानाचा पारा ४१ अंशांवर आहे. मे हीटचा तडाखा नागरिकांना जाणवतो आहे. तप्त उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहे. दुसरीकडे शनिवारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहरात दुपारी वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर होता. सायंकाळनंतर वातावरणात थोडा गारवा जाणवत होता. तसेच वाऱ्याचा वेग वाढला होता. सात वाजेनंतर वाऱ्याचा वेग ताशी ३४ किलोमीटर इतका होता. वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले. दत्त मंदिर परिसरातील सरस्वती कॉलनीत केबल शॉर्ट झाल्याने जवळपास ५० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच गजानन कॉलनीत वीजवाहिनीवर वृक्ष पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वलवाडी भागातील वसाहतीमधील काही घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत काम करत होते. काहींना मात्र रात्र अंधारात काढावी लागली.

बातम्या आणखी आहेत...