आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा इशारा:मद्यपानाविषयीचा अहवाल मागे घ्या; अन्यथा अधिकाऱ्यांनाच काळे फासू

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिला मद्यपान करतात असा अहवाल राष्ट्रीय काैटुंबिक आराेग्य विभागाने दिला आहे. हा अहवाल चुकीचा असून तो मागे घ्यावा, अन्यथा या अहवालासाठी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. याविषयी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदाेलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. राष्ट्रीय कौटुंबिक विभागाने दिलेल्या अहवालाचा पक्षाने निषेध केला. या अहवालामुळे धुळे जिल्ह्यातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. राज्यामध्ये धुळ्यातील महिला चेष्टेचा विषय झाल्या आहे. हा अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार झाला याचा खुलासा करावा, जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्वेक्षण केले याची माहिती द्यावी. हा अहवाल जिल्ह्याच्या विरोधात रचलेले षड्यंत्र आहे. त्यामुळे अहवाल मागे घ्यावा, अशी मागणी रणजीत भोसले, यशवंत डोमाळे, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र चौधरी, रईस काझी, मनोज कोळेकर, भटू पाटील, उमेश महाजन, नजीर शेख, फिरोज पठाण, गोरख कोळी, रामेश्वर साबरे, कुणाल पवार, जगन ताकटे, अंबादास मराठे, मयुर देवरे, भूषण पाटील, दानिश पिंजारी, संजय सरग आदी सहभागी झाले.