आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:पदोन्नत कर्मचाऱ्याचे रोखले वेतन; चौकशी सुरू

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका शाळेत नियम डावलत प्रयोगशाळा तंत्रज्ञाला वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. या संदर्भात ‘दिव्य मराठीने’ वृत्त प्रसिद्ध केले. तसेच यासंदर्भात लामकानी येथील नानासाहेब पाकळे यांनी लेखी तक्रारदेखील केली. त्याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन थांबवले आहे. तसेच वेतन पथक अधीक्षकांना संबंधिताचा प्रस्ताव पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात २०१९ मध्ये बदली झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आजही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता देण्याचे सत्र सुरू आहे.

या मान्यतांच्या आधारे वेतन पथक अधीक्षक कार्यालयात प्रस्ताव सादर करून वेतन निश्चिती करण्यात येते. त्यानंतर वेतन बिलाचा फरकही काढण्यात येतो. धुळे तालुक्यातील एका संस्थेत असाच प्रकार घडला. २०१९ मध्ये बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या आधारे प्रयोगशाळा सहायकाची वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नियमानुसार कनिष्ठ लिपिकाने हक्क सोडला किंवा पद रिक्त असेल तर अशी पदोन्नती देता येऊ शकते. मात्र कार्यरत लिपिकाला डावलत प्रयोगशाळा सहायकाला नियमबाह्यरीत्या पदोन्नती देण्यात आली. शिवाय जून २०१९ पूर्वीची मान्यता दाखवत आता २०२२ मध्ये वेतन निश्चिती करण्यात आली. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित लिपिकाचे वेतन राेखले आहे. तसेच संबंधित प्रस्तावाची पडताळणीचे आदेश दिले आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
लामकानी येथील नानासाहेब चुनीलाल पाकळे यांनी लेखी तक्रार देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यात लिपिकाच्या पदोन्नतीवर आक्षेप घेतला आहे. तसेच संस्थेत सात शिक्षकांच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. या मान्यतादेखील चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत. त्याची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. अाठ दिवसांत चौकशी करण्यात आली नाही तर उपोषणाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...