आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी जलसुरक्षकांच्या दिमतीला महिला; प्रशिक्षण देणार, किट प्राप्त

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जलस्त्राेतांची रासायनीक व जैविक तपासणी करण्यासाठी आता जलसुरक्षकांना महिला असतील. त्यासाठी प्रत्येक गावातील पाच याप्रमाणे जिल्ह्यातील ३ हजार ३८० महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतीच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचे २ हजार ७८७ स्त्रोत आहे. त्यात धुळे तालुक्यात ५९०, साक्री तालुक्यात १६६, शिरपूर तालुक्यात ७२२ तर शिंदखेडा तालुक्यात ४०७ स्त्रोतांचा समावेश आहे. जलस्त्रोतातील पाणी तपासण्याची जबाबदारी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे आहे.

आता प्रत्येक ग्रामपंचायतीला पाण्याची तपासणी करण्यासाठी किट उपलब्ध झाल्या आहे. त्यामुळे जलसुरक्षक, आरोग्य सेवक आणि गावातील पाच महिलांच्या मदतीने गावनिहाय जलस्त्रोतांची तपासणी हाेईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदींना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर २९ नोव्हेंबरपासून तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय प्रशिक्षण शिबिर होईल. शिबिरात आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येकी पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल.

पाण्यातील कॅल्शिअम, क्लोराइड तपासणार
तपासण्यांमध्ये पाण्याचा पीएच, गढूळपणा, कठीणपणा, पाण्यात असलेले कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोराईड, फ्लोराईड, अल्कालिनीटी, क्लोरिन अवशेष, लोह, नायट्रेड आदींच्या प्रमाणांची तपासणी होईल. ग्रामपंचायत व गावस्तरावर पडताळणी नंतर अहवाल प्रयोगशाळेला व पाणी गुणवत्ता अभियान कक्षाला पाठवला जाईल.

जिल्ह्यात ६७६ गावात तपासणी
जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून पाणी तपासणीसाठी ग्रामपंचायत निहाय किट प्राप्त झाली आहे. तसेच जिल्ह्यात ६७६ महसुली गावे असून प्रत्येक गावातील ५ याप्रमाणे ३ हजार ३८० महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर या महिला तपासणी करतील.

बातम्या आणखी आहेत...