आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महिलांनी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घ्यावा; सहेली ग्रुपच्या पदग्रहण सोहळ्यात दीपक पाटील यांचे प्रतिपादन

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात कितीही कामे करा, फुकटात काहीही मिळत नाही, तरीही आपण जनहिताची कामे करत राहिले पाहिजे. सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असून, त्यांनी अधिक पुढे यावे. जनहिताच्या सामाजिक कार्यात आम्हीही आपल्या सोबत असल्याची ग्वाही सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी दिली.शहादा येथील पटेल रेसिडेंसीच्या सभागृहात आयोजित जायंट्स दामिनी सहेली ग्रुपचा पदग्रहण समारंभप्रसंगी दीपक पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर जि.प. माजी कृषी सभापती अभिजित पाटील, डॉ. प्रदीपकुमार पटेल, जायंट्स फेडरेशनचे रवींद्र जमादार, जायंट्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, माधव पाटील, प्रा. आर. टी. पाटील, दामिनी सहेलीच्या अध्यक्षा अलका चौधरी, कैलास भावसार, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी अभिजित पाटील, रवींद्र जमादार, डॉ. प्रदीप पटेल, प्रा. आर. टी. पटेल, माधव पाटील, प्रा. अरविंद पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

दामिनी सहलीच्या नूतन अध्यक्षा अलका चौधरी व सदस्यांच्या शपथविधी जायंट्सचे युनिट डायरेक्टर कैलास भावसार यांच्या हस्ते झाला. तसेच जायंट्स दामिनी सहेली ग्रुपची कार्यकारिणी जाहीर केली. सूत्रसंचालन नीलिमा चौधरी यांनी केले. आभार हिरकणी सहेलीच्या अध्यक्षा अलका जोंधळे यांनी मानले. कार्यक्रमास नरेंद्र पाटील, मानक चौधरी, पालिकेचे सेवानिवृत्त करनिरीक्षक गणेश पाटील, प्रमोद सोनार, डॉ. विवेक पाटील, सतीश जव्हेरी, भूषण बाविस्कर, आशा चौधरी, मनीषा भावसार उपस्थित होते.

समाजाचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा
जायंट्स फेडरेशन-२ अ च्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांचा प्रयत्नांनी हा पाचवा ग्रुप स्थापन झाला. महिलांनी समाजकारणात उंची घेऊन समाज स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...