आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या‎ महिलांचा पोलिसांतर्फे गौरव‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनानिमित्त शहरातील पोलिस‎ प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय हॉलमध्ये‎ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार‎ झाला. जिल्हा पोलिस दलातर्फे हा‎ कार्यक्रम झाला.‎ जिल्हा पोलिस अधीक्षक संजय‎ बारकुंड अध्यक्षस्थानी होते. या वेळी‎ महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषदेच्या‎ अध्यक्षा अश्विनी पाटील, उपविभागीय‎ अधिकारी तृप्ती धोडमिसे, न्या. श्वेता‎ चांडक, मनपाच्या उपायुक्त संगीता‎ नांदुरकर, संजीवनी सिसोदे, धरती देवरे‎ आदी उपस्थित होते.

विशेष कामगिरी‎ करणाऱ्या ६८ महिलांचा पोलिस अधीक्षक‎ संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक‎ किशोर काळे, सहायक पोलिस अधीक्षक‎ एस ऋषिकेश रेड्डी यांच्या हस्ते गौरव‎ झाला. कार्यक्रमाचे आयोजन शहर‎ वाहतूक शाखेच्या अधिकारी संगीता‎ राऊत, मीना तडवी, सुवर्णा महाजन,‎ विजया पवार, राजश्री पाटील, लक्ष्मी‎ करंकार, संजय पाटील यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...