आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राजेशाही प्रतिष्ठानतर्फे महिलांचे अथर्वशीर्ष पठण; उन्हाळ्यात वृक्षांमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना गारवा अन् मिळते सावली

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात असलेल्या आनंदनगरातील राजेशाही प्रतिष्ठानतर्फे काॅलनी परिसरातील खुल्या जागेवर गेल्या ६ वर्षांपूर्वी ५० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करीत त्यांची जाेपासना, संवर्धन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आज हा खुला परिसर वृक्षांमुळे हिरवागार झाला आहे.आनंदनगर परिसरातील नागरिक, महिलांनी एकत्र येत आठ ते दहा वर्षांपूर्वी गणेशाेत्सव सुरू केला. सुरुवातीला लहान स्वरूपात गणेशाेत्सव साजरा करीत. त्यात लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन सातव्या दिवशी स्नेहभाेजन व महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली.

त्यासाठी काेणाकडूनही वर्गणी न गाेळा करता मंडळात असलेल्या सदस्यांकडूनच स्वेच्छेने वर्गणी दिली जाते. तसेच संपूर्ण गणेशाेत्सवाच्या काळात मंडळाकडून विविध उपक्रमासाठी हाेणारा खर्चाचे बजेट वाढल्यास ताे वाढीव खर्चही सर्व पदाधिकारी विभागून घेत स्वखर्च करतात. या मंडळाकडून आनंदनगर परिसरात असलेल्या खुल्या जागेवर ६ वर्षांपूर्वी गणेशाेत्सवापूर्वी वृक्षाराेपणाचा उपक्रम राबवण्यात आला हाेता. त्यात जवळपास ५० ते ६० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली गेली. मंडळात प्रसाद ठाकूर, संगीता बाेरसे, मीना पाटील, प्रतीक पातूरकर, केतन सावंत, कार्तिक पाटील, अनिरुद्ध कुळकर्णी, संजय ठाकूर, प्रवीण बाेरसे, याेगेश माेराणकर, जितेंद्र पाटील, प्रशांत बाेरसे, दिनेश खर्डीकर आदींकडून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते.

क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन
मंडळाकडून दरवर्षी दहा दिवसांचा गणेशाेत्सव साजरा करण्यात येताे. त्यात परिसरातील महिला, युवक, युवती, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. तसेच मंडळाच्या सदस्य व त्यांच्या परिवारासाठी स्नेहभाेजनाचा कार्यक्रमही घेतला जाताे. त्यासाठीचा खर्च मंडळाचे पदाधिकारी करतात. तसेच महिला वर्गाकडून गणेशाेत्सवाच्या काळात दरराेज अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम गणपतीपुढे घेण्यात येता. त्यातून मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचे कार्य मंडळातर्फे हाेते.

बातम्या आणखी आहेत...