आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रम:महिला सन्मान, पर्यावरणावर प्रबोधन; निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळील गोंदूर येथील प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झाले. स्नेहसंमेलनात मनोरंजनात्मक कार्यक्रमातून देशभक्ती, स्त्री सन्मान, पर्यावरणाचे संरक्षण आदी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे स्नेहसंमेलन झाले नव्हते. त्यामुळे यंदाच्या स्नेहसंमेलनात विशेष उत्साह दिसून आला.

कार्यक्रमाचे उद‌्घाटन डॉ. यतीन वाघ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र ओंकार निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी कोरिओग्राफर सिद्धार्थ आखाडे उपस्थित होते. दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी पारंपरिक वेशभूषा दिवस, मिस मॅच डे, चॉकलेट डे, फिशपाँड, अंताक्षरी आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नृत्य, संगीत, नाटक, एकांकिका आदी कार्यक्रम सादर झाले.

या वेळी मनोरंजनासह देशभक्ती, स्त्री सन्मान, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर जनजागृती झाली. संस्थेच्या सचिव प्रा. शुभांगी रवींद्र निकम, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सागर जाधव, प्रा. अमित सिंहल, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनंत वाघ, आयटीआयचे प्राचार्य बडगुजर आदी उपस्थित होते.

प्रा. चंद्रकांत सूर्यवंशी, प्रा. शुभम ठाकरे, प्रा. अक्षता पाटील, प्रा. पायल चव्हाण, प्रा हर्षदा पाटील, प्रा. सायली हिरे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. शुभम ठाकरे व प्रा. गणेश चौधरी यांनी केले. प्रा. संदीप शिंदे, प्रा.कृपाल कान्नोर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. दरम्यान, स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांवर असलेला कामाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...