आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विधवा प्रथा निर्मूलनासाठी महिलांचाच पुढाकार

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधवा प्रथेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात विधवा महिलांचा हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला. त्यात काेविडमुळे पती गमावलेल्या महिलांसह अन्य महिलांचा समावेश होता. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबवला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सचिन शिंदे, गटविकास अधिकारी संजय साेनवणे, सहायक गटविकास अधिकारी याेगेश गिरासे, गटशिक्षणाधिकारी एफ.के. गायकवाड, दिशा समितीचे सदस्य वसंत पावरा आदी उपस्थित हाेते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाल्या की, पतीचे निधन झाल्यावर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते. तिच्या गळ्यातील मंगळसुत्र ताेडले जाते.

हातातील बांगाड्या फोडल्या जातात. पायातील जाेडवे काढले जातात. या प्रथा बंद झाल्या पाहिजे. विधवा महिलांना आजही ठराविक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी हाेऊ दिले जात नाही. चुकीच्या प्रथांमुळे महिलांच्या अधिकारांचे हनन होते आहे. विधवा प्रथांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.

अधिकाऱ्याची संकल्पना, कर्मचाऱ्यांचे सहकार्य
विधवा महिलांचा सन्मान करण्याची संकल्पना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांची हाेती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी संकल्पना राबवण्याची सूचना केली. तसेच महिला अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमासाठी पुढे आल्या. कार्यक्रमात सहभागी महिलांना साड्या देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...