आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष:नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे काळ्या फिती लावून काम

शहादा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे ५ सप्टेंबर शिक्षकदिनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागणी पूर्ततेसाठी निवेदन सादर करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागणीची पूर्तता आणि अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणाच्या असंतोष पसरला आहे. शासनाने मागण्या मान्य करूनदेखील आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, सचिव प्रा. जी. एन सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. आसिफ शहा, प्रा. आबासाहेब हुंबरे, सहसचिव सचिव प्रा. भरत चव्हाण, तळोदा तालुका अध्यक्ष प्रा. हेमंत चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. वाय. जी. पाटील, प्रा. साळुंखे, प्रा. संजीवनी भावसार, प्रा. किरण सूर्यवंशींसह प्राध्यापक उपस्थित होते.

निवेदनात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागणी बाबतीत शासन स्तरावर काहीच कार्यवाही होत नाही. मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने व रोखीने अनुदान देण्यात यावे, वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता वेतन देण्यात यावे, आयटी विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे, एक नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतर सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासह १२ मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...