आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळींनी केले काम ;जयनगर येथील स्मशानभूमीची सफाई

शहादा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जयनगर येथे उभादगड रस्त्याला असणाऱ्या गावातील अमरधाम व पारधी समाजाच्या स्मशानभूमी परिसरात महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांच्या स्वखर्चातून काटेरी झुडपांची साफसफाई करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी यांनी गावातील अमरधाम परिसर व पारधी समाजाच्या स्मशानभूमीचा परिसरात काटेरी झुडपे आणि बाभुळची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली होती. म्हैस नदीकाठी असलेला हा परिसर काटेरी झुडपे वाढल्यामुळे हा परिसर नयनरम्य दिसण्यासाठी वृक्ष लागवड करता येत नव्हती. तसेच या रस्त्याने जयनगर येथील ग्रामस्थ उभादगड शेतशिवारात जाण्यासाठी व उभादगड व धांद्रे खुर्द येथील ग्रामस्थ जयनगर येथे किराणा बाजार व इतर कामासाठी येत असतात. तसेच जयनगर हे हेरंब गणेशाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात असून या रस्त्यालगत अंगारकी चतुर्थीला येणाऱ्या भाविकांची पार्किंगची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे हा परिसर नयनरम्य दिसण्यासाठी त्या जागी वृक्ष लागवड करण्यासाठी युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी स्वखर्चातून या परिसराची काटेरी झुडपे काढून साफसफाई केली आहे.

युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी हे दरवर्षी जयनगरसह परिसरात हजारो वृक्षांची लागवड करीत असतात. तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. याचाच भाग म्हणून या वर्षी त्यांनी जयनगर येथील अमरधामची स्वतःच्या पैशातून झाडे, झुडपे, काढून साफसफाई केली आहे. याप्रसंगी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य छगनरावजी पारधी, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पारधी, माजी उपसरपंच संदीप माळी, आदिवासी पारधी महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मोहन पारधी, जगन पारधी, विनोद पारधी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...