आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका क्षेत्रात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांनंतर समितीचे पुनर्गठण झाले. महापालिका आरोग्य विभागाच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला. मागील सहा महिन्यांत समितीकडे बोगस डॉक्टरविषयी केवळ एक तक्रार आली झाली.
आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक दर महिन्याला घेण्याची सूचना केली आहे. दर महिन्याला बैठक घेणे शक्य नसेल तर किमान तीन महिन्यांतून एकदा समितीची बैठक घेणे आवश्यक आहे. पण तीन वर्षांपासून महापालिकेच्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीचे कामकाज ठप्प होते. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कार्यकाळ समितीची एक बैठक झाली. देशमुख यांच्यानंतर आलेले तत्कालीन आयुक्त अजिज शेख यांच्या कार्यकाळात बैठक झाली नाही. समितीचे सदस्य असलेले काही अधिकारी सेवानिवृत्त झाले. काहींची बदली झाली. त्यामुळे समितीचे पुनर्गठण करणे आवश्यक होते. त्यासाठी बुधवारी समितीची बैठक पार पडली. या वेळी समितीचे पुनर्गठण करून नवीन सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले.
सहा महिन्यांत एक तक्रार
मनपा बोगस डॉक्टर शोध समितीकडे गेल्या सहा महिन्यात केवळ एक तक्रार आली. शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसून एक डॉक्टर कागदपत्रांवर एमबीबीएस डॉक्टर असल्याचा शिक्का मारत असल्याची ही तक्रार होती. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला संबंधित डॉक्टर सापडला नाही.
सदस्यांना नियुक्तीपत्र
मार्च २०२१ पासून आरोग्य विभागाचे कामकाज पाहतो आहे. सहा महिन्यात बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक झाली नाही. आता समितीचे पुनर्गठण करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रे दिले. समितीचे शहरात लक्ष आहे. एम.आर.शेख, आरोग्याधिकारी, महापालिका, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.