आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ:आरटीओ कार्यालयात वादानंतर काम बंद

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोहाडी उपनगर परिसरातील आरटीओ कार्यालयात शुक्रवारी एजंट व लिपिकात वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. या वेळी अधिकाऱ्यांनी समन्वयातून वाद मिटवण्याऐवजी कर्मचाऱ्यांना पोलिसात जाण्यास सांगितले. त्यामुळे मोहाडी पोलिस ठाण्यात कर्मचारी आले होते. पण उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

आरटीओ कार्यालयात शुक्रवारी दुपारी कागदपत्रे पुढे सरकत नसल्यामुळे एका आरटीओ एजंटने महिला लिपिकाला विचारणा केली. त्यातून वाद वाढला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे दालन गाठले. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात जाण्याची सूचना केली. त्यामुळे काही कर्मचारी पोलिस ठाण्यात आले. इतरांनी कार्यालयात काम बंद केले. दुसरीकडे मोहाडी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांनी तक्रार मांडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...