आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी अधिकारी कार्यालय व कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेत तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आहारात तृणधान्याचा वापर करावा असे आवाहन या वेळी करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी पौष्टिक तृणधान्याविषयी शास्त्रीय माहिती दिली. \
आहार तज्ज्ञ डॉ. अनंत पाटील यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगितले. बाजरी, ज्वारी, नाचणी, राळा, भगर, सावा, बर्टी, कुटकी आदींपासून बनवलेल्या पदार्थांची माहिती दिली. डॉ. अमृता राऊत यांनी अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध मशिनरींची माहिती दिली.
बाजरा पैदासकार डॉ. खुशाल बऱ्हाटे यांनी बाजरी उत्पादन, सधन लागवड याविषयी, डॉ. दीपक शिंदे यांनी शेतकऱ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली. श्रीराम शंकर पाटील यांनी अनुभव कथन केले. या वेळी प्रकल्प संचालक विनय बोरसे, प्रा. डॉ. जगदीश काथेपुरी, प्रा. डॉ. पंकज पाटील, रोहित कडू, धनराज चौधरी, आतिश पाटील, दिलीप पाटील, वाल्मीक पाटील, प्रकाश भुता पाटील, श्रीराम शंकर पाटील, जी. टी. धोंगडे, वाल्मीक प्रकाश, सी. के ठाकरे, ए. पी. निकुंभ, नवनाथ साबळे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर सर्व शेतकऱ्यांना तृणधान्यापासून तयार केलेले भोजन देण्यात आले. पुष्पलता हिंगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमाकांत सावंत, खुशाल पाटील, नितीन मासुळे, शुभम पाटील, जयदीप पाटील आदींनी प्रयत्न केले. तृ़णधान्याचा वापर वाढावा या उद्देशाने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तृणधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पदार्थांपासून साकारली रांगोळी
कार्यशाळेनिमित्त सभागृहात व सभागृहाबाहेर बाजरी, ज्वारी, राळा, नागली, राजगिरा, भगरीचा वापर करून रांगोळी काढण्यात आली. तसेच तृणधान्याचे माहितीपर प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनात बाजरी, ज्वारी, चिकणी, नाचणी, राळा, भगर, सावा, बर्टी, कुटकी, कोदो, भगर आदी धान्याचे नमुने प्रदर्शित करण्यात आले. उद्योजकांनी नाचणीवर आधारित उपपदार्थांचे कुकीज, नागलीचे विविध पदार्थ तयार करून मांडले होते. शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरीच्या विविध जातींचे नमुने आणून प्रदर्शनाची शोभा वाढवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.