आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात विश्व पर्यावरण दिन उत्साहात; शहाद्यात निसर्गाच्या सान्निध्यात विश्व पर्यावरण दिन साजरा

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात विश्व पर्यावरण दिन उत्साहात पार पडला. या निमित्त नैसर्गिक वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील प्रा.मयूर चौधरी, प्रा.पंकज पेंढारकर व प्रा.संदीप पाटील यांनी पर्यावरणाचे महत्त्व व वृक्षारोपण या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निसर्गाच्या सान्निध्यात खुल्या वातावरणात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी एकत्रितपणे चर्चा केली.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांना उत्तरे देत प्राध्यापकांनी त्यांचे निराकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...