आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन:खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आले यमराज

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागातील खड्डेमय रस्ते मृत्यूचा सापळा बनले असून नाल्यांवरील पुलांना कठडे नाही. याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अनोखे आंदोलन केले. आंदोलनात सहभागी एकाने यमराजाची वेशभूषा केली. तो रेड्यासह रस्त्यावर उतरला. खड्डे न बुजवता तुम्ही मला आमंत्रण देत आहात का? अशी विचारणा या यमराजाने महापालिका प्रशासनाला केली. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहे. त्यातही विद्यार्थी जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. देवपूरातील झेड.बी. पाटील महाविद्यालय ते जयहिंद चौक रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खडी पडली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व सायकलवरून जाणारे विद्यार्थी पडतात. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी विद्यार्थी नाल्यांवर असलेल्या रस्त्यावरून जातात. पण नाल्यावरील फरशी पुलांना संरक्षण कठडे नाही.

त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, नाल्यावरील रस्त्याला संरक्षण कठडे लावावे, या मागणीसाठी आंदोलन झाले. मनपाचे खड्डे बुजवले नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात अॅड. प्रसाद देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, विठ्ठल पगारे, राहुल मराठे, गुरुराज पाटील, योगराज पाटील, चेतन पाटील, सनी पाटील, मधुर महाजन, यश एलमामे, भावेश गद्रे आदी सहभागी झाले होते.