आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड्यांना प्रशिक्षण:सारंगखेड्यात आजपासून यात्रा; 12 एकरवर टेंट सिटी, घोडे बाजार सज्ज

सारंगखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्रीक्षेत्र एकमुखी दत्त प्रभू यांच्या जयंतीनिमित्त यात्रोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. ६० एकर जागेवर यात्रा भरते आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावर १२ एकर जागेत टेंट सिटी बनवलेली आहे. त्यात पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. यात्रेत ६ एकर जागेत घोड्यांच्या प्रशिक्षणाची सोय आहे.

श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त मंदिरात उद्या बुधवारी सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाआरती होईल. यंदा २० लाखांहून अधिक भाविक भेट देतील, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे सचिव भिकन पाटील यांनी दिली. मंदिरात २४ तास सीसीटीव्हीची नजर असेल.

श्री दत्तप्रभूंची तब्बल ३०० वर्षांहून अधिक जुनी मूर्ती मंदिरातील एकमुखी दत्त प्रभूंची मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त या धातूची आहे. ती तीनशेहून अधिक वर्षे जुनी आहे. ही मूर्ती दगडी गाभाऱ्यात आहे. यात्रेनिमित्त १४ डिसेंबरपासून चेतक फेस्टिव्हल सुरू होणार आहे. त्यात विविध स्पर्धा होतील. यात्रेच्या पूर्वसंध्येला सारंगखेडा घोडे बाजारात २७ घोड्यांच्या खरेदी- विक्रीतून ५ लाख ६१ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल यात्रेच्या कालावधीत ३ कोटींच्या वरती जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...