आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग:सुखकारक जीवनासाठी योग निसर्गोपचार मूलमंत्र ; दिव्य मराठी विशेष : नवापूर महाविद्यालयात ऑलनलाइन वेबिनारात डॉ. ए. टी. पाटलांचे प्रतिपादन

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारुण्यावस्थेत युवकांनी योग निसर्गोपचार हे तंत्र स्वीकारल्यास आपण निरोगी जीवनाकडे वाटचाल करू यात शंका नाही, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ए. टी. पाटील यांनी आपले स्वतःचे अनुभव कथन करत योग आणि निसर्गोपचार याचे महत्त्व स्पष्ट केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि वि.ए.सो.चे सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय विसरवाडी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित योग, निसर्गोपचार आणि निरोगी आरोग्य या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने नुकतेच करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ सचिन नांद्रे तर प्रमुख वक्ते म्हणून नवापूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच योग व निसर्गोपचार अभ्यासक प्रा. डॉ नितीनकुमार माळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. टी. पाटील, विभागीय समन्वयक डॉ. विशाल करपे तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष धनेधर यांनी केले. तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बी व्ही.गावित यांनी मानले. या वेबीनारमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागी साधकाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच ऑनलाईन प्रमाणपत्र आपल्या ईमेलवर पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...