आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:युवांना देशातच रोजगार मिळायला हवा: तिवारी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धुळ्यात अग्रवाल समाजाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन

देशात शिक्षण घेऊन विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा प्रतिभावंत तरुणांना भारतात रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रतिभेचा देशाच्या विकासालाही लाभ होऊ शकतो, त्यासाठी युवकांनी संकटांकडे सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे आहे, असे विचार नागपूरचे माजी महापौर व मोटिव्हेशन तज्ज्ञ दयाशंकर तिवारी यांनी केले. अग्रवाल समाजाच्या प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या युवा सत्रात ते बोलत होते. दरम्यान, रविवारी नवरत्नांचा सन्मान केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी प्रांतीय अधिवेशनाला शहरात सुरुवात झाली. सकाळी पहिल्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने अधिवेशनाचे अनौपचारिक उद‌्घाटन झाले. अग्रवाल समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी, गोपाल अग्रवाल, सुनील सिंघानिया, विनोद अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...