आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अभियांत्रिकीच्या स्नेहसंमेलनात तरुणाईचा जल्लोष; रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, धावण्याच्या स्पर्धांनाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित धुळे येथील एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात स्प्लॅश २०२२ स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यात तरुणाईचा जल्लोष पहायला मिळाला. एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात स्प्लॅश या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, चांगले नागरिक बनावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य, गायन, अभिनय, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय अग्रवाल, धुळे कॅम्पस मार्गदर्शक डॉ. अजय पसारी, कॅम्पस विकास समितीचे अध्यक्ष संजय अग्रवाल, समिती सदस्य संतोष अग्रवाल, समिती सदस्य अजय अग्रवाल,अभियंता ईश्वर पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश साळुंखे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, सीबीएसई प्राचार्या सुनंदा मेनन, सी.ए. कुणाल पसारी उपस्थित होते.

डॉ. संजय अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. नम्र जोशी तसेच विद्यार्थ्यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा. चंदू कोळी, असि. रजिस्ट्रार अनमोल सूर्यवंशी, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकांनी प्रयत्न केले.

सांस्कृतिक कार्यक्रम रंगले
स्नेहसंमेलनात सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य, गायन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गोळाफेक, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, धावण्याची स्पर्धा यांसारख्या विविध क्रीडास्पर्धा मध्ये देखील भाग घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...