आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यातील रामी-पथारे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले गणेश भागवत फंड (वय. ३६) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात नोंद झाली आहे. येथील गबाजी नगरमधील रो-हाऊसमध्ये जिल्हा परिषद शिक्षक गणेश भागवत फंड राहत होते. ते गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर वरच्या मजल्यावर झोपायला गेले. त्यानंतर सकाळी त्यांची पत्नी रूपाली फंड यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा आतून बंद होता.
त्यामुळे त्यांनी शेजारील नागरिकांना बोलवले. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. या वेळी गणेश फंड यांनी सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. फंड यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत गणेश फंड हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी आहे. ते पंधरा वर्षापासुन शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी वळदे-चवळदे सात ते आठ वर्ष सेवा दिली आहे. ते रामी-पथारे येथे मागील चार वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.