आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा परिषद शाळेच्या भिंती बोलक्या; विद्यार्थ्यांना हसत खेळत मिळते शिक्षण

साक्री4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा असा गौरव प्राप्त करणाऱ्या इंदवे येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेने कात टाकली आहे. शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व लोकसहभागातून शाळेच्या जुन्या व नव्या इमारतींना आकर्षक रंग दिला आहे. त्यामुळे शाळेचे रूप पालटले आहे. शाळेच्या भिंतींवर विविध विषयांच्या पाठ्यक्रमाची माहिती रंगवण्यात येऊन भिंती बोलक्या केल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालता-बोलता शिक्षण मिळते.

इंदवे गावातील जिल्हा परिषद शाळेचे रूप बदलण्यासाठी इंदाई देवी ट्रस्टचे संचालक, भजनी मंडळ, ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांच्यासह नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेतला. प्रभारी मुख्याध्यापक डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, उपसरपंच मनोहर पवार, सदस्य गोकुळ बोरसे, उपाध्यक्ष अनिल जाधव, सहशिक्षक संदीप जगदाळे यांच्या मदतीने शाळेच्या दोन्ही इमारतींच्या रंग देण्यासाठी ७० हजार रुपये जमा केले. त्यानंतर शाळेच्या भिंतीवर विविध विषयांच्या पाठ्यक्रमाची माहिती रंगवण्यात येऊन भिंती बोलक्या करण्यात आल्या. विजय भदाणे, मोहन गावित, पाराजी पैठणे, इंदाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष दिनकरराव देवरे, सरपंच कविता नीलेश देवरे, उपसरपंच मनोहर पवार, अध्यक्ष प्रमोद ठाकरे, गोकुळ बोरसे, प्रवीण भदाणे, नीलेश देवरे, माजी सरपंच जितेंद्र सोनवणे आदींनी प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांना लागली गोडी
इंदवे येथील जि.प. शाळेच्या स्वतंत्र दोन इमारती आहेत. दोन्ही इमारतींना रंग दिला. सरंक्षण भिंतीवर गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक तक्ते, आकर्षक चित्रे, संदेश, सामान्यज्ञान वाढीसाठी उपयुक्त माहिती रंगवली. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...