आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:जिल्ह्यातील 1 हजार 64 रेशन दुकाने‎ आजपासून तीन दिवस ठेवणार बंद‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने मोफत धान्य देवून‎ रेशनिंगचे दुकाने पूर्णत: बंद‎ करण्याचा घाट केंद्र सरकारने‎ घातलेला आहे. त्यामुळे‎ कंटाळून निम्मे परवानाधारक‎ राजीनामे देतील आणि इतर‎ परवानाधारक कारणे दाखवून‎ दुकाने बंद करतील अशी मोदी‎ सरकारची योजना असल्याचा‎ आरोप करीत नंदुरबार‎ जिल्ह्यातील १ हजार ६४ रेशन‎ दुकानदारांनी ७ ते ९ फेब्रुवारी‎ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या‎ निर्णय घेतलेला आहे.

सोमवारी‎ अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य‎ दुकानदार व केरोसीन परवानाधारक‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन‎ यांनी माहिती दिली. नंदुरबार‎ जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य‎ दुकानदारांना महासंघाच्या वतीने दि.७‎ ते ९ फेब्रुवारी या तीन दिवशी ऑल‎ इंडिया फेअर शॉप डिलर्स फेडरेशन,‎ नवी दिल्ली सलग्नीत अखिल महाराष्ट्र‎ राज्य स्वस्त धान्य दुकानदार व‎ केरोसीन परवानाधारक महासंघाच्या‎ वतीने दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे‎ आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.‎ पत्रकावर संजय चौधरी, प्रमोद बोडखे,‎ नाना ठाकरे, जे बी शर्मा, शुभम‎ रघुवंशी, ए एम अग्रवाल, प्रताप‎ चौधरी, सदाशिव राजपूत,सुनील वैद्य,‎ सु.भा वैद्य, प्रकाश चौधरी,अक्षय‎ चौधरी आदींच्या सह्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...