आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्याय दूर करा:विद्यापीठाच्या तांत्रिक चुकीमुळे तळाेदा समाजकार्य चे १०० टक्के विद्यार्थी नापास

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ‘सोशल वेल्फेअर अँड सोशल जस्टिस’ या विषयात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण ठरवले असून ही बाब तांत्रिक अडचणीमुळे झाल्याचे कळते. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा वसावे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत नुकतीच माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाला पत्राद्वारे कळवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत अभाविपने कुलगुरूंना निवेदन दिले. या विषयाची दखल घेत विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठाने लवकर लावावेत, अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या वेळी अभाविपकडून देण्यात आला. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश कार्य समितीचे सदस्य नीलेश हिरे, नंदुरबार जिल्हा सहसंयोजक योगेश अहिरे, अश्विनी गोसावी, भूषण घुगे, मयूर मराठे, दीपक पाडवी, हितेश साळी, आश्विन सुरवाडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...