आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना प्रतिबंधक लस:मातृ वंदना प्रतिष्ठानतर्फे १०२ नागरिकांना लस

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मातृवंदना प्रतिष्ठान, माळी वाडा परिसर, जिल्हा आरोग्य विभाग आणि यशवंत गायतोंडे मेडिकल अँड रिसर्च एज्युकेशन केअर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सुमारे १०२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

यावेळी १२ ते १४ वर्ष वयोगटा साठी कार्बोवॅक्स, १५ ते १७ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन आणि १८ वर्षांवरील व्यक्तींना कोविशील्डची तसेच बूस्टर डोसची लसही देण्यात आली. यावेळी लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून हे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरणाबाबत विचारणा केली. त्यांना कोरोना लसीकरणाबाबत प्रोत्साहित केले.

बातम्या आणखी आहेत...