आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरीला ब्रेक:चोरट्यांनी लांबवलेल्या होंडाच्या 11 दुचाकी जप्त; आता हँडल लॉक करायला विसरू नका

नंदुरबार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहर पोलिसांनी वाहने चोरणाऱ्या टोळीतील गुजरातमधील दोघांना पकडले असून त्यांच्याकडून ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत टोळीतील इतर आणखी आरोपींचा पोलिस शोध घेत नंदुरबार जिल्ह्यातून चोरी गेलेल्या इतर मोटारसायकलीही हस्तगत होऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले. नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेशच्या सिमेवर असल्याने दररोज एक ते दोन मोटारसायकली चोरीस जात आहेत.

नांदरखेडा येथे राहणाऱ्या प्रकाश रुपा चव्हाण यांच्या मालकीची मोटारसायकल (एमएच-३९-एल-२३७१) ही १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान डी.एस.के. मार्केट परिसरातून चोरी झाली होती. या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोटार सायकल चोरीचा. तपासासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केली. पथकाने विजय अंता पाडवी (वय २२ वर्षे, रा. मटावल ता. कुकरमुंडा जि. तापी गुजरात), विनेश लक्ष्मण पाडवी वय २४ वर्षे, रा. जुन उंटावद ता कुकरमुंडा जि. तापी गुजरात) असे या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोहेकॉ अतुल बिऱ्हाडे, जगदीश पवार, संदीप गोसावी, पोना भटू धनगर, बलविंद्र ईशी, स्वप्निल पगारे, स्वप्निल शिरसाट, योगेंद्र सोनार, पोशि अनिल बडे, शिविजय नागोडे, इम्रान खाटीक, कल्पेश रामटेके यांच्या पथकाने केली.

जप्त केलेल्या मोटारसायकली अशा
एक काळ्या रंगाची हिरो होंडाची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-३९-एल-२३७१), होंडाची शाईन (सीबी १२५ एस.पी विना नंबर प्लेट), काळ्या रंगाची होंडाची सीबी युनिकॉर्न (जीजे-२६-बी-७९७८), निळ्या रंगाची सुझुकीची एक्सेस काळया रंगाची बाजाज (एमएच-३९-एम-४१७८), काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस तिचेवर निळा पट्टा असलेली स्प्लेंडर प्लस (विना नंबर प्लेट), काळ्या रंगाची हिरोची स्प्लेंडर प्रो तिचेवर पांढरा पट्टा असलेली (एमएच-३९-एस- ९५३२), राखाडी रंगाची होंडाची सी.बी शाईन तिचेवर निळा पट्टा असलेली (एई-७९६८), काळ्या रंगाची हिरोची एच.एफ. डिलक्स काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स अशाप्रकारे ११ मोटारसायकली जप्त केल्या.

दोन्ही सराईत चोरटे : विजय पाडवीवर यापूर्वी शहादा येथे १३ गुन्हे, तळोदा येथे २, नवापूर पोलिस ठाणे येथे २, शिरपूर पोलिस ठाणे (धुळे जिल्हा) येथे १ असे एकूण १८ गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनेश लक्ष्मण पाडवी याच्यावर यापूर्वी अक्कलकुवा पोलिसात एक व शहादा पोलिस ठाण्यात एक असे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...