आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी:शहरातील 13 डीजे, डॉल्बी सिस्टिम स्वेच्छेने पोलिस दलाकडेच सोपवले

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आवाहनाला नंदुरबार शहरातील डी. जे. व डॉल्बी असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील १३ डी. जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे स्वेच्छेने जमा केले. तसेच वाहनांच्या चाव्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे डी. जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडीत माळी यांनी सुपूर्द केल्या.

यावेळी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार, डी. जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण बडगुजर, सचिव राकेश कापडे, योगेश बारी, धिरज कुंवर, गणेश सुळ, भूषण कोळी, वरुण चव्हाण, पवन कोकणी, माऊली साऊंडचे मालक नितीन कुंभार, मारुती राया साऊंडचे मालक घारू कोळी, वैष्णवी साऊंडचे मालक संकेत भोईटे, साई समर्थ साऊंडचे मालक नीलेश मराठे, साई सरकार साऊंडचे मालक शैलेश मराठे, खंडू माळी, बंटी जगताप, राहुल चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलिस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी. जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...