आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना लुटणारे धुळे जिल्ह्यातील चार दरोडेखोरांसह एकास स्थानिक गुन्हे शाखेकडून ३० तासांतच जेरबंद करण्यात यश मिळाले. त्यांच्याकडून २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा त्यांना परत मिळणार असून पाेलिसांच्या कामगिरीचेही काैतुक हाेत आहे. भालेर येथील शेतकरी सुनील पाटील व त्यांचा भाऊ हंसराज पाटील यांनी गुजरात राज्यात विक्री केलेल्या कापसाची रक्कम घरी घेऊन जाताना त्यांना अडवून बंदुकीचा धाक दाखवत हे १३ लाख ९४ हजार रुपये लुटल्याची घटना १० मार्च रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासह अतिरिक्त पाेलिस अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथक घटनास्थळी पोहाेचले. जिल्ह्यात, जिल्हा सीमेलगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना नाकेबंदीचे आदेश देत सहा वेगवेगळी पथके पाठवली. कापूस व्यापारी उमेश पाटील याने दरोडा टाकल्याची माहिती प्राप्त झाली. संशयित पाटील याने हा गुन्हा त्याचा धामणगाव, जि. धुळे येथील नातेवाईक चैत्राम पाटील व अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती दिली. पथकाने तत्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चैत्राम ऊर्फ झेंडू राजधर पाटील (वय ४१), सागर उर्फ बंटी सुभाष पाटील (वय २४), दीपक उर्फ बबलू सुभाष पाटील (वय २६) तिन्ही रा. धामणगाव यांनी पैसे, बंदूक शेतात लपवल्याचे सांगितले. शिरूड (ता.धुळे) येथील राहुल भोई या तरुणाचे असल्याचे सांगितले.
तत्परतेने गुन्ह्याची उकल, शेतकऱ्यांना दिलासा
या गुन्ह्यात पाचही आराेपींना ताब्यात घेतले असून वरील साहित्यासह ५० हजारांचे पाच मोबाइल व गुन्ह्यावेळी वापरलेले सात लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २१ लाख २ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींसाेबत तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात दिला. या आराेपींनी आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. येथील पोलिसांनी अवघ्या ३० तासात गंभीर गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी बजावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.