आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ख्याती दूरपर्यंत पोहाेचली असून दिवसेंदिवस तेथील श्री एकमुखी दत्ताच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागत आहे. तर घोडे बाजारामुळे आकर्षित होऊन नाशिकची किशाेरवयीन युवती घोड्यावर स्वार होऊन शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नाशिकहून सारंगखेडा येथे यायला निघाली आहे. सहज हौस म्हणून निघालेल्या या चिमुकलीचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.
नाशिकच्या नावावर मानाचा तुरा रोवण्याचे तिचे ध्येय आहे. विशाल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हृदया पृथ्वीराज अंडे ही गंगा घाट येथील रोकडा बाबा मंदिरापासून घोड्यावर स्वार होऊन सारंगखेड्याच्या यात्रेसाठी निघाली आहे. सकाळी आठ वाजता तिने नाशिक सोडले. सोबत तिचे वडील पृथ्वीराज अंडे हे वेगळ्या वाहनाने येत आहेत.
घाेडेस्वार हृदयाचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. वडील पृथ्वीराज अंडे म्हणाले, हृदयाने सहज सारंगखेड्याला अश्वावर स्वार होऊन जाण्याचे ठरवले. हा इव्हेंट छोटा होता. पण तो कधी मोठा झाला कळलाच नाही. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांंनी हृदया घोड्यावर स्वार हाेवून प्रवास करत चांदवडला पोहाेचली. २१ डिसेंबरला ती सारंगखेडा येथे पोहाेचल. मार्गात ओझर, पिंपळगाव या ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला.
चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा यात्रेेचे फलित
केवळ हौस म्ह्णून हृदयाने घोड्यावर बसून चार दिवसांत सारंगखेडा गाठण्याचे ठरवले आहे. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या साहसी प्रवासाचे चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, हे चेतक फेस्टिव्हल व सारंगखेडा यात्राेत्सवाचेच फलित आहे. यामुळे इतर मुलामुलींनाही अशा साहसाची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी यावेळी आवर्जनू सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.