आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३० ते ३१ डिसेंबर या दाेन दिवसांच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान १४१ वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध संबंधित पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या माेहिमेंतर्गत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यांतर्गत ५, उपनगर पोलिस २३, नंदुरबार तालुका ८, नवापूर १४. विसरवाडी १०, धडगाव ५, म्हसावद ५, सारंगखेडा ६, अक्कलकुवा ११, तळोदा ८, मोलगी ३ व शहर वाहतूक शाखा २४ गुन्हे असे एकूण १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवताना आढळलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याचा प्रस्ताव येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवण्यात येणार असून लवकरच त्यांच्यावर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवताना आढळलेल्या ३९१ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ३५८ वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
तर गुन्हा दाखल करून परवाना निलंबन दारु पिऊन वाहन चालवणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जिवाला देखील धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवताना आढळल्यास गुन्हे दाखल करुन परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पाेलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.