आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्रपेक्षा गुजरातच्या पंपावर 14.34 रुपयांनी मिळते स्वस्त; तळोद्यात रहिवास, पेट्रोल मात्र गुजरातचे

बोरद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल दरामध्ये सतत वाढ होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक होरपळू निघात आहेत. तर नजीकच्या गुजरात राज्यात महाराष्ट्रपेक्षा पेट्रोल हे तब्बल १४.३४ रुपयांनी स्वस्त असल्याने गुजरात राज्याला लागून असलेल्या तळोदा तालुक्यातील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गुजराच्या पेट्रोल पंपावर जात आहे. यामुळे रहिवास नंदुरबार जिल्ह्यात आणि प्रवास गुजरातच्या पेट्रोलने अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गुजरात राज्याची सीमा तळोदा तालुक्याच्या तीनही बाजूला लागून आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर तळोदा शहरात पेट्रोलचे दर ११४.२१ प्रतिलीटर झाले आहेत. गेल्या ८ दिवसांमध्ये साधारणतः ४.७५ रुपयांनी हे दर वाढले आहेत. त्यामानाने गुजरात राज्यात हे दर ९९.८७. प्रतिलीटर या प्रमाणे आहेत. यात दोन्ही राज्यात भावाची तफावत पहिली तर एकूण १४.३४ रुपयांचा फरक जाणवतो आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील बरेच वाहन धारक गुजरात राज्याला पेट्रोलसाठी पसंती देत असल्याचे चित्र आहे..

केवळ ३ ते ६ किलोमीटरचेच अंतर :
तळोदा नंदूरबार रस्त्यावर हातोडा गावापासून अवघ्या ३ किलोमीटरवर गुजरात राज्याचा खाजगी कंपनीचा पेट्रोल पंप आहे. तसेच अक्कलकुवा रस्त्यावर तळोदापासून ६ किलोमीटरवर अंतरावर गुजरात राज्याचे आश्रावा हे गाव आहे. या पंपावर महाराष्ट्रातील तळोदा तसेच ग्रामीण भागातील नागरिक पेट्रोल स्वस्त मिळत असल्यामुळे वाहनातील इंधन क्षमता पूर्ण करून घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...