आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वामिनारायण मंदिरात 14 व्या पाटोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांसह शताब्दी महोत्सव होणार

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट जनजाती संमेलनाने झाली उत्सवाला थाटात सुरुवात

कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथे बीएपीएस श्री स्वामिनारायण मंदिरात १४व्या पाटोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामिनारायण मंदिर सत्संगी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

पाटोत्सवनिमित्त स्वामिनारायण मंदिर, सुरत येथील कोठारी उत्तम प्रकाश स्वामी सांकरी (गुजरात) येथील पूजनीय पूर्ण दर्शन स्वामी यांच्या उपस्थितीत रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी शिखर पूजन, ध्वजारोहण संस्थेचे पूज्य उत्तम प्रकाशस्वामी, पुण्यदर्शनस्वामी आदर्श तिलकस्वामी, ध्यान जीवन स्वामी, मंगल भूषण स्वामी, नारायण प्रिय स्वामी, वेद भगत मैत्री भगत आदी संत-महंतांचे मार्गदर्शन, प्रवचन, विराट जनजाती संमेलन, आपले गाव आदर्श गाव व्यसनमुक्ती अभियान व प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घोष, विशिष्ट विशाल जल सभेचे आयोजन दृकश्राव्य साधनांद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी ६ ते ८ विराट जनजाती संमेलन, ६ जून संध्याकाळी ६ ते ८ माझे गाव आदर्श गाव सुंदर प्रस्तुती, ७ जून रोजी ४ ते ५.३० पाटोत्सव महापूजा विधिवत व ५.३० ते ६.०० शिखर पूजाविधी व ६ ते रात्री ८ वाजेपासून प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव उद्घोष, विशिष्ट विशाल जन सभा आदींसह धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना उपस्थितीचे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...